STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Tragedy Action

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Tragedy Action

माझी मुलगी

माझी मुलगी

1 min
1.3K

सर्वस्व माझे माझी मुलगी आहे

आहे तिला अर्पण सर्वस्व माझे,

माझे नशीब मोठे लाभली ही कन्या

कन्यादान हे आहे भाग्य माझे.


माझे मीच जानतो मुलीचे मोठेपण

मोठेपण लाभले मला तिच्यामुळे,

तिच्यामुळे मी जगतो सन्मानाने

सन्मान मज लाभला तिच्यामुळे.


तिच्यामुळे स्वर्ग अवतरला

अवतरला गरीबां घरी आनंद,

आनंद दिला आम्हा तिनेच

तिनेच निर्मीले आनंदी आनंद.


आनंद तिचा पाहतो डोळयाने

डोळयाने तिला या मी जपतो,

जपतो तिचे मी नाजूक मन.

मन येता भरून मी झुकतो.


झुकतो तिच्या भल्यासाठी

भल्यासाठीच सर्वस्व अर्पण,

अर्पण करतो प्राण माझा

माझा आत्माच माझे दर्पण.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract