परम प्रेम (अष्टाक्षरी)
परम प्रेम (अष्टाक्षरी)
झाली पहाट सोवळी
माय दिसते सावळी
सुर्यलाली ही हसली
भूमीवरी पसरली
छटा नारंगी पिवळी
स्पर्श तिचा कोवळी
अरूणाने फाकवले
तेज त्याचे चकाकले
वृक्ष टवटवी वल्ली
पक्षी वर्दळाची कल्ली
सुस्वरांची ही रागिणी
त्यांची निरागसी गाणी
रंगसंगती फुलांची
गुंजवणी पाखरांची
गंध सुवास हूरती
मोरमयुरी नाचती
ओठी कृष्णाच्या मुरली
राधाराणी ही लाजली
गोपीका नृत्यात दंग
मनमोहना सत्संग
प्रीत वृंदावनातली
साक्षात अवतरली
अनोखी शैली सृष्टी
परम प्रेमाची वृष्टी..

