Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti Nagpurkar

Others

3  

Jyoti Nagpurkar

Others

मुक्तछंद वृत्तात ही काव्यरचना **शिक्षक आणि शिक्षण**

मुक्तछंद वृत्तात ही काव्यरचना **शिक्षक आणि शिक्षण**

1 min
191


शिक्षकाची महिमा मोठीच

आई-बाबाची थोरवीही मोठीचं

जसे आले , बाळ कुशीत 

आई बाळाचा होई संवाद 

हृदयातून निघे नाद व त्यातून परिसंवाद

आईची शिकवण माय ममत्वतेची

शिक्षिका असते,ही स्नेहभावनेची


शाळेतला शिक्षक तत्वप्रधान 

भासतो , निष्ठाप्रधान

शिक्षकामधे असते भाव

भावना ही, तोलून मोजूनं

असतोचनं , गणित तज्ञ

छडी लागे छमछम

अन् विद्या, येई घमघम

चुकलं , प्रश्र्नाचे उत्तर

दे दणा दण, पाठीवर

हा असतो नादसूर

शिक्षकाचे , शिस्तप्रिय वागणं

करे जसे , काटेकोर पालनं

कडक याला अपवाद

कधी मुलायम, जसं 

लोणी हांडीतलं

जर नाही समजलं

तर समजवून सांगणारं

गुणवैशिष्ट्ये तयांचे अनेक 

योग्यदिशांचे मार्गदर्शक

विद्यार्थीचं व्यक्तिमत्व घडवणं

जसे,समाजाभिमुख बनवणं

खरोखरचं !

 गुरू विणा नाही ज्ञान

या म्हणीचा अर्थ महान....


म्हणावयाचे आज, मला एकचं

बदलले , शिक्षणाचे तंत्र

बदलले , शिक्षकाचे मंत्र

काढले जगाने , विविध यंत्र

घडतं विद्यार्थी, पूर्वी निस्वार्थ भाव

आज घडतयं , स्वार्थ भाव

विद्यार्थीत येई , स्वावलंबीत्वपण

आज होई , परावलंबित्वकरण

हा दोष कुणा नाही साधुचा

आहे आजच्या शिक्षणपद्धतीचा

घडवावे असे,अनेक माणिक रत्नं

परक्याचे नाही, स्वदेशांचे होवूनं .....


Rate this content
Log in