प्रेमभाव
प्रेमभाव


रूप तुझे लोचनी
बघत असते सतत
हसऱ्या डोळ्यांतून वाहती
प्रेमाचा पाझर अखंडित
मीपण हरवून जाते
तुझ्या सहवासात जेव्हा
तुझीच असते सावली
जीव अडकतो तेव्हा
किती अद्भुतता छायेत
येते जगण्यासाठी बळ
जन्मोजन्मी ओढ जशी
अंतरंगी जीवात कळ
आनंदाचा भरमार तू
जगण्याची कला तू
आकर्षणाची मर्यादा तू
हर श्वासातला भाव तू
समर्पित माझे प्रेमभाव
अश्रूंचे ओघ सतत
यत्न झाले सफल
निरागसतेनी प्रीत जपतं...