कोविड संकट आणि निसर्गाचे सांत्
कोविड संकट आणि निसर्गाचे सांत्


सृष्टी जरी आज भरतेय, अद्भुत रमणीयता
आभाळमायेचा आज पाझर फुटला, अश्रूत
दिनेश कधी रुसतो नभाला कवटाळून
भूमाता लेकरासाठी, प्रेमाची छाया भरत
कोविड संकट दूर करण्यास, जणू सांत्वन देत
निखळ धुंदीत तारे लुकलुकीत
अद्भूत अदिती सृष्टी तारांगण सजवून
रेखवित नक्षी चंद्र, दाखवी मी तुझ्या सोबत
श्वास-उच्छवास प्राणनाथ, झाला उत्सुक
कोविड संकट दूर करण्यास, जणू सांत्वन देत
सुंदर लोचन मलमली हिरवळ घालत
झुंजार नदीचा प्रवाह झुळझुळत
निर्मळ होऊन गंगामाई वाहत
लखलखी प्रतिबिंब पाण्याच्या ओघात
कोविड संकट दूर करण्यास, जणू सांत्वन देत
सुर्याच्या तपोवनातही वनाई बहरली
पक्ष्यांनीही पंख फैलावून उडून भुर्रकन
उदयातच क्षीण झाली, ही नवखी सुर्यलाली
उजागर करते मला, नको हूळहूळूस
कोविड संकट दूर करण्यास, जणू सांत्वन देत
इंद्रधनुष्य अवतरले नभात, तीर रोखून
नको नको म्हणता जीवावर उदार होत
कोण हा नाशवंत, करतोय घातपात
उडते जशी माझी, जीवाची तारांबळ
कोविड संकट दूर होण्यास, जणू सांत्वन देत...