आजचे राजकारण
आजचे राजकारण
सावल्यांचा खेळ मी पाहिले
उचापतीतले बाहुले ते दिसले
भुंकणे हे गुणधर्म तयांचे
दरबारात नौटंकी खुब नाचे
गरीबांची नाही चिंता कसली
ती तर त्यांची ढाल असती
मिश्यावर सतत हात फिरवी
अहम् भावावर नेतेशाही मिरवी
काय म्हणावे अशा राजकारण्याला
विरोधक मरोधक करून राहीला
पालथी पडणारी बुद्धी उसंडत
स्वत: बनतो विदुषक मुसंडत
आपला गौरव आपच करतो
द्वेषाचा आहारीस भिक घालतो
इतरांच्या इमानीला जाणुन भुलवून
पराजयाचं मुख पुरतं लपवून
उणे पणाची उंची गाठलेला
सत्तेचा वापर गैर केलेला
मुखवटा घालून चोर नाचतो
गाजा करणाराच मिचक्या मारतो..
