कोविड संकट आणि निसर्गाचे सांत्वन
कोविड संकट आणि निसर्गाचे सांत्वन


आख्ख् जनविश्वावर, आलय संकट
कधी आटोक्यात येईल, याचा अंत
मनाची मानसिकता , होतेय हतबल
थरकापते ह्रदयात, जीव घेऊन मुठीतं
बिकट होतेय जसं , सारं जग हे
हाल बेहाल जीवन , दुःखाची झळ सोसुनं
जीवघेणा खेळ रोज, खेळतो हा अघोरी
घुसखोरी करून, याला त्याला तारूनं
अजब गजब जगणं वागणं
चिंतामणीची चिंता भोवरयातं
अंकुराच झाड होणेतर नाही
ग्रासला मन बंद पिंजऱ्यातं
धास्तावलेल्या ह्रदयातं, नाही धीर
रमतेय कल्पना, कधी सानिध्यात
ठिणगी भरते,समाचाराची डोक्यात
काळजाचा ठोका, वाजतो जोरात
ठीगर लावत , जगतोय निष्पाप
भटकंती झाली, त्याची वानरसेना
नाहीं भान या , उचापती विषाणूंचा
पोटाची खळगीसाठी , निघतोय गावकरीमेना
तहानभुक व्याकूळ होऊन मरतोय
लॉकडाऊन करतोय जगण्याला डाऊन
उपासमारीची खीळ करते वेडापिसा
पाऊल शहर सोडतं नागडी पोरं घेऊनं
मनामनाची जवळी ही अलगद
लाभली आता , अनूभूतीची कास
मानवाचा माधव , करतो अभ्यास
घडतेय नव पर्वातं , अनोख हे खास
आशा बांधून , करूया हा यत्न
सृजनयोग, वैद्यकयोग करणे जतन
सुविचार अमर होईल , आरोग्य रक्षण
करने फकस्त आता, अधमसूराचं पतन