STORYMIRROR

Jyoti Nagpurkar

Inspirational

3  

Jyoti Nagpurkar

Inspirational

हो नं ! मी एक दुर्गाच

हो नं ! मी एक दुर्गाच

1 min
253

हो नं ! मी एक दुर्गाच

जन्म घेतला स्त्रीच

आहे मला याचा अभिमान

आहे नं माझ्यात करणारं शस्त्र प्रहार 

दैत्यांचा नाश करणार अस्त्र संहार


हो नं! मी एक दुर्गाच


ज्ञानाचा प्रकाश फाकवणारी , प्रज्लवीत ज्योती ही, मीच. 

नऊ महिने गर्भात वाढवणारी, सशक्त माऊली ही, मीच

हाडामासाचा या देहाला माणूस, बनवणारी माता ही, मीच

सर्वांना पंचपक्वान्न भरवणारी, अन्नपूर्णा ही, मीच


हो नं! मी एक दुर्गाच


अनंत नावे माझी,अन् अनंत भुमिकेत वावरणारी

आणि सावरणारीही, मीच

मीच आणि फक्त मीच

आई, भगिनी, सहचारिणी, अन् सखी, प्रियतमा ही मीच 

अर्जुन आणि कृष्ण ही मीच

कुटुंबाचा रथ हाकणारी , मार्गदर्शन करणारी प्रथम गुरू ही मीच


हो नं! मी एक दुर्गाच


अष्ट्भुजी जरी मी , मन आहे ममतामयी

संसार माझे, सारे जगत आहे मायामयी 

संजीवनी या , निसर्गरम्य परिसराची मायी

मग! का हा अंधविश्वास तुमच्या डोयी


हो नं! मी एक दुर्गाच


अस्तित्वाचा माझा, का छळ व्हावा

अपमानाचा कडु रस मला, का द्यावा

कोमल कायेला कामभोगानी, का नासवावा

निष्कलंक देह माझा चरित्रहीन, का करावा


हो नं! मी एक दुर्गाच


नको आता ही दया माया

नको आता ही दुर्देवी काया

बदलावी आता ही मानसिकताच

अंत व्हायलाच हवे, आता दृष्ट प्रवृत्तीचाच.


हो नं! मी एक दुर्गाच...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational