सांगते सखी तुला मी गाऱ्हानी माजी गं!
सांगते सखी तुला मी गाऱ्हानी माजी गं!


रोज रोज पावसाची सरी
नस्ती करी उठा गरी
आभाळ येती, विना वार
हेलकावे घेतं, ठोकी दार
अंगाची जशी होती लाही
अंगावर घाम धरधर वाही
ऊन पावसाची होत, पाखरांची तळ मळ
सांगते सखी तुला मी; गर्हाणी माजी -गं
करशील का गं माझे, सांत्वन जरा. गं
रोज रोज करपते दाळ
केव्हा जाई कारवास काळ
खरी खोटी गोट नाही,
काळीज माज मेल्या वानी
नवर्याची दिनरात कटकट,
कधी करते सासु भडीमार
भीम दावी गदा रोळ
करतो सारं मनाचा पाचोळ
लोटांगण घालतं; फिरी घरभर
सांगते सखी तु-ला, गर्हाणी-माजी गं
करशील का गं माझे; सांत्वन-- जरा गं
कधी मरण हे ओढवेल
टांगती तलवारी चा तोल
करी सालस उप धान
परी न पडे; पदरी मान
हरपतो सर्व परी झाले बेभान
रुसले माझे, सत्व हे उघड
सावर माये, लेकरू हे उनाड
सांगी सखी तुला मी; गाऱ्हाणी -माजी गं
करशील का गं माझे; सांत्वन...जरा गं