बावरे मन
बावरे मन
बावरे मन हसतो का तालात
काय हरवले, भाव हे लपवत
वेड धावते अकारण परिणीतीत
शैलीत दिसते प्रित ही नकळत
उमललेल्या फुलांचा प्रांगणात
भृंगा करतोय जसे लाळ
ह्रदयात हेलकावे घेतो श्वास
जिंकून मन करेल घायाळ
आशा जागते मनोपाशात
क्षणक्षण वेध घेत उसावेच
कल्पनेच्या घेरयात उधळते रंग
नेहात स्वप्न सजते पुणर्वेच
अजब प्रितीचे धागे विणलेले
रुपदा चित्त जुळते काळजात
सानिध्याची साद घालते निरस
रमते प्रेम नगरीच्या अंगणात
संगसंगती जुळते मन-मनात
तुझ्या माझ्या प्रेमाची छाया
त्याग परित्याग कशास हवे
अखंडीत झरेल प्रेमाची माया___