STORYMIRROR

Pranali Kadam

Inspirational

4  

Pranali Kadam

Inspirational

भारतीय जवान

भारतीय जवान

1 min
28.7K


भारतभूमीत घेतला तू जन्म

भारतदेश रक्षण करण्यासाठी,

नातीगोती विसरून तू सारे

झुंज दिलीस काश्मिरसाठी..!!


ऊनपाऊस, वादळवारा सोसून

रान, झुडपातून पायी फिरलास,

उपाशी राहून शत्रूशी लढा दिला

तूच खरा मर्द, देशाचा तू परिस..!!


वंदन करितो तुज देश सारा

सुखाची निज मिळे देशाला,

जातपात न बाळगता तुम्ही

राष्ट्र प्रेषितांचे दिले आम्हाला..!!


वर्षे उलटून गेले स्पर्श करून

गावच्या मातीचा गंध घेऊन,

भारतभूमीत जन्मला तू वीर

आत्म्याचा पेहराव तू लेवून..!!


हृदयी निर्भयता, डोळ्यात आग

उन्नत भाळावरी असे शतघ्नी,

शत्रूला न डगमगता राहे तू धीट

उभा राहीला तू ताठ निशिदिनी..!!


मायभूमीचा असे तू अभिमान

गर्जतोस बंदूक घेऊन हातात,

भारतीय सैनिक असे तुझं नाव

गाव सोडून पाय रोवले हौदात..!!


पत्नी, पुत्र, मातापितांना सोडून

जंग लढवित तू रात्रंदिन अविरत,

भूमीवर सांडून तुझे लाल रगत

होऊन बलिदान, केले भू सुरक्षित..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational