STORYMIRROR

Asha Kulkarni

Inspirational

4  

Asha Kulkarni

Inspirational

माझी प्रतिभा

माझी प्रतिभा

1 min
26.5K


प्रतिभा माझी रुसली रुसली

न कळे किंवा कुठे हरवली

शोध शोधुनी थकले दमले

परंतु नाही अजून गवसली.

आळविते तिज भगवंतासम

तरीही नाही पाझर फुटला

अशी कशी हो क्रूर जाहली

स्नेह भक्तीचा धागा तुटला.

तिच्यावीणा मज मुली करमेना

कशा कशातच चित्त रमेना

येई प्रतिभे ! लवकर येना

आर्त मनीचा मुळी राहीना .

शब्द मुके बघ तुजवीण झाले

प्रेम रंगहि मलूल सारे

तुझा स्पर्श्ची त्या संजीवन

तुझ्या दर्शने अमृत व्हावे.

येई प्रतिभे येई झडकरी

आज नेत्रीचे असुनी अंतरी

तुला पाहता शब्द उमलली

नक्षत्रांच्या वेलीवरती.

ऐकून विंनती प्रसन्न झाली

माझी प्रतिभा आली आली

रिमझिम रिमझिम बरसून मोती

चांदण्यात त्या शब्दची न्हाती.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational