विठ्ठला ये रे
विठ्ठला ये रे
विठ्ठला येरे माझ्या घरी
तुला पाहीनं डोळा भरी
कौतुक तुझे आहेे जगभरी
भक्तीचा मेळा आहेे वारकरी
विठ्ठला येरे माझ्या घरी
तुला पाहीनं डोळा भरी
पाय बांधले माझ्या घरी
मनं धावे रेे तुझ्या दरबारी
विठ्ठला येरे माझ्या घरी
तुला पाहीनं डोळा भरी
चराचरात तुझीच स्वारी
का रुसला तूू माझ्या वरी
विठ्ठला येरेेे माझ्या घरी
तुला पाहीनं डोळा भरी
मी प्रारब्धानेेेे बसले घरी
तू दर्शन दे घरच्या घरी
विठ्ठला येरे माझ्या घरी
तुला पाहीनं डोळा भरी
मनं भरून येई उरी
माझे पंढरपुर माझ्या घरी
विठ्ठला येरेेे माझ्या घरी
तुला पाहीनं डोळा भरी
किती सत्व घेई मुरारी
मी आहेे कर्माचा वारकरी
विठ्ठला येरे माझ्या घरी
तुला पाहीनं डोळा भरी
