STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

सुंदर शिक्षण

सुंदर शिक्षण

1 min
30.6K


शिक्षणाचा प्रयोग केला

वाचन प्रक्रिया सुधारण्याला

शाळेची गोडी लागण्याला

उत्साह वाढविण्याला


कृती आराखडा उदयाला

आनंददायी शिक्षण देण्याला

त्याने आत्मविश्वास वाढला

न्यूनगंड निघून गेला


मायबोलीचा वापर केला

बालक बोलू लागला

खेळ, नाटुकली प्रभावी शिकण्याला

नाच, संवाद आहे जोडीला


कलाकृतीच्या शिक्षणाला

प्राधान्य बालक क्षमतेला

उत्साह नवीन शिकण्याला

शिक्षणाची आवड बालकाला


श्रवण, भाषण, वाचण्याला

झाली अवगत त्याच्या बुध्दीला

मुलांचा सहभाग वाढला

शाळाकडे आकर्षित झाला

कृतियुक्त शिक्षणाला


सांगड बोलते करण्याला

चित्रांच्या वास्तवतेला

शब्द संपत्ती वाढण्याला

प्रयोग यशस्वी झाला


वाचन उद्दिष्ट गाठण्याला

प्रत्येकाचा विकास झाला

प्रगत शिक्षण महाराष्ट्राला

बालक वाचू लागला


शिक्षणात बदल झाला

कृती करण्याला आतुर झाला

निर्माण झाला जिव्हाळा


भीती मनातली पळाली

वाचन क्षमतेने किमया केली

महाराष्ट्राची प्रगती झाली

बहुभाषिक शिकू लागली


मातृभाषा प्रगत झाली

वाचन तंत्र यशस्वी झाली

शाळेत प्रयोग झाले

कृतीत ते आणले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational