STORYMIRROR

Kanchan Kamble

Tragedy

2  

Kanchan Kamble

Tragedy

तुझे भाव मजला कळलेच नाही

तुझे भाव मजला कळलेच नाही

1 min
2.3K


तुझे भाव मजला कळलेच नाही

तसे शब्द ओठी जुळलेच नाही.

कशी साद दिधली मजला सख्या रे !

तुझे आर्त अजुनी वळलेच नाही.

तुला बोलकी ही भाषा कळावी

तसे भाव माझे चळलेच नाही.

रुसावे असे रे मी काय केले ?

चुकीने कधी मी छळलेच नाही.

नशीबा कधी तू येणार येथे

कसे भोग? पुन्हा टळलेच नाही.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy