तुझे शब्द
तुझे शब्द
1 min
14.8K
तुझे शब्द अलवार ऐकांती छेडू लागते....
घेते पिंगा सभोवती मन बोलू लागते....
हलकेच पापनि चे दार बंद करुनी
स्वप्न डोळ्यात सजते....
क्षण बावरते मग अश्रू गळू लागते.....
हसतात रडतात क्षण, कधी शुन्यात जाते..
अंत:पुराच्या महाली मस्त रमू लागते.....
चिमटा काढते हात, कान बहीरे होते...
भूरळ घालते प्रित, जीवन मौनात
चालते...
उमजेना ही कशली , मनोदशा होते
फुलते पारिजात रातचा, दिवस निघता कोमजते.

