वेड लागता
वेड लागता
प्रेम आंधळं असतं
मग वेड ते काय असतं
मनावर जोर चालत नाही
तरी नजरेनं वेध घेत असतं
मनाची उघडी कवाडं बघण्याकरिता
भिरभिरणारे डोळे
तेच तेच ऐकण्याकरिता
तडतडणारे कान
कवेत घेतल्यानंतरची
धडधडणारी छाती
आणि तो
हवाहवासा सुगंध
विचारात गुंतल्यानंतरचं
हरवलेलं भान
सगळं कळतं पण वळवता येत नाही
असा सहवासाचा अट्टाहास
हे आणि
असं खूप काही
वेड लावणारं
ते काय असतं

