मने जुळता
मने जुळता
प्रेमाला नसते भाषा
नसते शब्दांची गरज
न बोलता उमजते गुज
समजते अगदी सहज
मन जुळली की मग
होते सोपेची सांगणे
न बोलता मनीचे भाव
कळतात नुरते मागणे
जरी धरिला अबोला
रुसवा पण वाटे गोड
जवळीक साधण्याचा
असे तो एकमेव तोड
वाढता सहवास जीवांचा
होतात मनानी एकरुप
तेच म्हणत होते मी आता
व्यवहाराचे असे स्वरूप
मन जुळण्यात हवी तडजोड
आठवावी सप्तपदीतील पाऊले
कधी आपले कधी दुजाचे
पहा कळले मनीचे ची चाहूल

