मेघ बरसले
मेघ बरसले
मेघ दाटूनी आले रंग काळ्या करड्या ढंगांनी ,
किलबील पक्षांची वाहे गंधाळलेली रातरानी ...
कळ येई धरणी हासला मृदूगंध वाऱ्यामधूनी ,
मन चंचल धावे प्रिती मागे आना त्याला पकडूनी ...
अश्या पहरी प्रेमाच्या जीव गेला गुंतूनी ,
शब्द ओठी आले डोळे बोलता लाजूनी ...
वेड प्रेमाचे गुलाबाला गुलाबी झाला चंद्र मनी ,
मेघ बरसले छंद हा आभाळाचा पांघरूनी ...
वेडावल्या भावना वेडावली प्रित गाणी ...
साद देई मनाला , सरी रिमझीम ,मेघ बससूनी ...
वेडावल्या भावना वेडावली प्रित गाणी ...
मनात साठवले क्षण ते जे गेले स्पर्शुनी ,
मोहरून आली कळी उमलली प्रेमानी ...
ओजंळीत शब्दांच्या प्रेम पाहे काळजात तरंगूनी ,
वलय तुझी आता माझ्या भोवती भासावानी ...
प्रतिबींब आरश्यात तुझे तूच डोकावे मनातूनी ,
नजरेला गेली नजर खूप काही सांगूनी ...
हर्ष नवा मनाचा सुख हे आले स्वर्गातून चालूनी ,
काटेरी वाट जरी घेई मन आकर्षूनी ...
जगने वाटे नव्याने आली ओली सांज जीवनी ,
मेघ बरसले छंद हा आभाळाचा पांघरूनी ...
वेडावल्या भावना वेडावली प्रित गाणी ...
साद घाली मनाला , सरी रिमझीम , मेघ बरसूनी ...
वेडावल्या भावना वेडावली प्रित गाणी ...

