पहिला पाऊस
पहिला पाऊस
पहिला पाऊस
प्रत्येकाला ओढ लावून जातो
प्रत्येक सरी सोबत
प्रेमाला नवी झळाळी देवून जातो
प्रत्येक प्रेमींना
वाट असते पावसाची
त्या प्रेमाच्या सरीत
चिंब चिंब भिजण्याची
पाऊस म्हटला की आठवतात
त्या सुंदर आठवणी
ज्या आणतात चेहऱ्यावर हसू अन
अश्रूंची करतात पाठवणी
प्रेम आणि पाऊस
यांचं नातंच काही वेगळं असतं
सगळ्यांनाच कळत की
आपलं प्रेम काही जगावेगळं नसतं
पावसाच्या प्रत्येक सरीसोबत
तीव्र होतात आठवणी
ज्या सोबत करतात
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी