आयुष्याचे गणित
आयुष्याचे गणित
आयुष्याचे गणित मांडता मांडता
मी कधी शून्य झाले कळलेच नाही...
कोणती नाती अधिक झाली
कोणती नाती वजा झाली
यांची बेरीज वजाबाकी करता करता
मी कधी शून्य झाले कळलेच नाही...
दुसऱ्यांचे मन सांभाळत
नात्यांची बेरीज करत गेले
स्वतःचे मन दुखावत
स्वतःला वजा करत गेले
प्रत्येकाच्या मनाचा ताळमेळ साधतांना
मी कधी शून्य झाले कळलेच नाही...
प्रत्येक नात्याला न्याय देता देता
स्वतःवर अन्याय करत गेले
प्रत्येकाचे सुख जपता जपता
स्वतःला दुःखात लोटत गेले
नात्यांचा समतोल सांभाळतांना
मी कधी शून्य झाले कळलेच नाही...
जेव्हा यातून जागी झाले
तेव्हा सोबतीला होता एकटेपणा
नात्यांचे गणित चुकीचे झाले
आयुष्याचे गणित मांडता मांडता
मी कधी शून्य झाले कळलेच नाही...
