तुझ्या आठवणींत......
तुझ्या आठवणींत......
नको त्या वेदना
नको त्या आठवणी
आठवणीतल्या त्या वेदनांनी
घायाळ झालेली मी मानिनी
नको नको म्हणतांना
पुन्हा वेडे हे मन तुझ्या आठवणीत डोकावते
आठवणीने तुझ्या घायाळ झालेल्या या हृदयाला
अश्रू गाळीत एकांतात सावरते
तुझ्या आठवणीने
मनात भावनांचे काहूर दाटते
मनातील सागरात उठलेल्या या भावनांच्या लाटा
अश्रू बनून डोळ्यातून वाहते
मी ही होती रे चारचौघींसारखी
जीवनाच्या या बागेत बागडायला मलाही आवडायचे
पण वेदनेने घायाळ होऊन झाली निवडुंगासारखी
वाळवंटासारखे जीवन हे आता एकट्यानेच आहे जगायचे