शांतता
शांतता
मनात हजार प्रश्न उभे करून गेली
ती एका क्षणाची शांतता
पाऊस पडत होता रिमझिम सरी बरसत होत्या
बोलत तू ही होतास बोलत मीही होते मध्येच
मौन देऊन गेली ती एका क्षणाची शांतता
सुटला सोसाट्याचा वारा
बरसल्या बेधुंद रेशमीधारा
का कुणास ठाऊक पण
बोलायच सुचल नाही
निशब्द झाले मी नवी वाट दाखवून गेली ती शांतता
डोक्यात विचार डोळ्यात विश्वास
ओठावर भास क्षणभराची आस
अन् काळजात काहूर उठून गेली ती शांतता..

