प्रेमसागर
प्रेमसागर
समुद्राच्या किनाऱ्यावर लाट उसळली
जणू तुझ्या माझ्या प्रेमाची प्रीत बहरली.....
गर्द हिरव्या झाडीत,
निसर्गाने मखमली शालू पसरला....
जणू श्रावण सरींत...
मोराने पिसारा फुलवला....
गारव्यातल्या गार हवेत ही...
थंड वाऱ्याची झुळूक...
संजना तुझ्या आठवणींत...
ती झुळूक ही मला आपलीशी वाटते.....
रात्रीच्या चांदण्या रातीत...
जणू त्या चंद्राला ही लागलेली
आपल्या प्रेमाची आस....
पावसाच्या सरींनी,
इंद्रधनुष्याच्या रंगानी,
जणू तुझ्या माझ्या प्रेमात....
आनंद बहरला....
आयुष्यात माझ्या
तुझ्या येण्याने
सर्व सुखे भरभरून मावत होती..
आपल्या त्या प्रेमात...
जणू त्या सुखांच्या सरीही...
बरसत होत्या....
तुझ्या माझ्या प्रेमाची प्रीत
जणू सप्तसुर...
त्या सुरांनी ही आता जुळावे...
तुझे माझे प्रेम आता एकत्र यावे....
माझ्या कवितेच्या प्रत्येक ओळीत
आता तुझे च नाव येतयं...
जणू पावसाची नी वीजांची लहर...
आता आपल्याच प्रेमाची वाट पाहतेय.....
आस तुझी ध्यास तुझा संजना....
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

