कसे कोण जाणे.....
कसे कोण जाणे.....
कसे कोण जाणे
आज स्मरले हे गीत
मनी आठवावे एक
जुळलेले मैत्र
तुटल्या न तारा कधी
न विरले तराणे
तुझ्या आठवांचे एक
स्मरते मी गाणे
तुझी माझी भेट सखया
पुन्हा आठवे आज
मी ओली चिंब
अन ओलेती ही सांज
तुझा मुग्ध आवाज
हृदयात झिरपलेला
तुझा आश्वासक स्पर्श
मी उरात जपलेला
झाले बेधुंद जेव्हा
कळले मलाच काही
असेच तर प्रेम असते
अल्लड, मुग्ध अन अबोलही
वाट ही जीवनाची
सोबतीने चालावी
तुझ्या माझ्या प्रेमाची सय
मी सतत स्मरावी
आधार तुझा खंबीर असा
वाटतो जेव्हा हवाहवासा
तुझा आश्वासक शब्द
देतो मना नवा दिलासा
गुंतलोही आपण दोघे
माघारी फिरणे नाही
नाव नसावे प्रेमालाही
न द्यावी कुठली उपमाही
या अंतरीचे त्या अंतरी
न सांगता कळावे काही
दिल्या घेतल्या वचनांची
व्हावी अमूर्त पूर्तताही

