तुज स्वप्नात रंगले
तुज स्वप्नात रंगले
झाली अवचित भेट भरलास तू मनात
नकळता ओढ जीवा लागे तुला बघण्यात
पुन्हा पुन्हा पाहताना मन तुझ्यात गुंतले
वेड जीवास लागले तुज स्वप्नात रंगले
वाटे नयनी ठसावे
तव चित्तात उरावे
मनीं तुझ्यात रमावे
वाटे तुलाच पहावे
भाषा माझिया प्रेमाची
वाटे तुला उमजावी
नाव कोरिता हृदयी
कळी माझी खुलावी
एकांतात मी रमते
शब्द सुमने गुंफते हात
हातात देऊनी तुझ्या स्वप्नात रंगते
सुख स्वप्ने संसाराची
रंगविली मनोमनी
तुज स्वप्नात रंगले
होऊनीया अर्धांगिनी

