इंद्रधनु 🌈💞
इंद्रधनु 🌈💞


माझ्या काळ्याभोर रंगहीन
जीवनात आलेलं इंद्रधनु तू.
माझ्या जीवनात रंग भरलेस
जीवन जगायला शिकवलेस तू.
तू खळखळता आनंद
मी एक दुःखाची लाट.
तुझ्या जीवनात येण्याने
बहरली माझी काटेरी वाट.
ऊन पावसाचे होता मिलन
इंद्रधनु दिसे नभावर.
तसे तू येता इंद्रधनु
पसरले माझ्या जीवनावर.
तू आणि इंद्रधनु
आहे दोहोत साम्य एक.
दोन्हीत चैतन्याची लाट
आणि अफाट नेत्रसुख.
तुझ्या प्रेमाच्या सप्त रंगांनी बहरले.
हिरव्या रंगाने नवचैतन्य आले.
निळ्या रंगाने उद्विग्न मन शांत केले.
तांबड्या रंगाने अंगात प्राण ओतले.
नारंगी रंगाच्या नशेने धुंद केले.
पिवळ्या रंगाने निराशेतून बाहेर काढले.
जांभळ्या रंगाने उत्साहाची लाट आली.
पांढऱ्या रंगाने प्रकाशमान काया केली.
इंद्रधनु येता निसर्गाचे सौंदर्य खुलते.
धरणी उत्साहाने प्रफुल्लित होते.
सर्वत्र इंद्रधनु आपली छटा उमटवते.
तसंच सारं तू जवळ असल्यावर भासते.