STORYMIRROR

Yogita Jadhav

Romance

3  

Yogita Jadhav

Romance

मी नसेन तेव्हा..

मी नसेन तेव्हा..

1 min
11.9K

मी नसेन तेव्हा...

झोंबणारा वाऱ्यात मी दिसेन तुला,

कोसळणाऱ्या धारांत दिसेन तुला,

तू निजताना अलगद थोपटताना दिसेन तुला.


मी नसेन तेव्हा...

आकाशातील विजेत मी दिसेन तुला,

विजेच्या आवाजात बोलताना दिसेन तुला,

जेवताना जेवणाच्या सुगंधात भासेन तुला.


मी नसेन तेव्हा...

सुंदरश्या फुलपाखरात दिसेन तुला,

झाडावरच्या फुलात हसताना दिसेन तुला,

डोळे बंद केल्यावर तुझ्या श्वासात जाणवेन तुला.


मी नसेन तेव्हा,

मी कानात गुदगुदल्या करणाऱ्या हवेत दिसेन तुला,

अंगाला चिकटलेल्या पावसाच्या पाण्यात दिसेन तुला,

कधीही बघ मी कायम तुझ्यात दिसेन तुला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance