STORYMIRROR

Yogita Jadhav

Others

3  

Yogita Jadhav

Others

महिला दिन

महिला दिन

1 min
225

महिलांशिवाय घर चालवणे एकदिवसही होते अशक्य !

फक्त एका दिवसात त्यांचे आभार मानण ,

खरंच आहे का शक्य?


रोजच्या रोज जर त्यांना आदर, प्रेम मिळेल.

जीवनात त्यांच्या आनंद भरेल .


फुलांसारखा सुंदरतेचा बहर चढेल.

विविध गुणांनी त्यांचं तेज उजळेल.


त्यांचे मधुर हास्य आयुष्यभर कानी पडेल.

त्यांच्यातील सकारात्मकतेमुळे दुःख दूर पळेल.


काय हवंय स्त्रीला, प्रेम आणि आदर.

सर्वात महत्त्वाचं असतं तीला तिचं घर.


आयुष्यभर केवळ संसारासाठी ती झटते नी जगते.

घरच्यांसाठी घरी नी बाहेर, राबराब ती राबते.


तिच्या कर्तृत्वाच्या प्रशंसेसाठी एक दिवस हा अन्याय आहे.

प्रती दिन आपुलकी मिळणं हा तिचा अधिकार आहे.


प्रत्येकाने जपलं पाहिजे त्यांच्या नाजूक भावनांना,

आई, पत्नी, मुलगी, सून ह्या मौल्यवान हिरकणींना.



Rate this content
Log in