ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
25
ओढ पावसाची..
थंडगार पावसात तुला भेटण्याची,
हातात हात घालून चिंब भिजण्याची.
ओढ पावसाची..
हिरवागार परिसर अवती भवती,
त्यात माझी गुलाबी झालेली कांती,
ओढ पावसाची..
पावसात चिंब थरथरणारं अंग,
गरमा गरम चहाचा सुगंध खमंग,
ओढ पावसाची..
कट्ट्यावर बसून मित्रांसोबत कल्ला,
गरमा गरम कणसावर मारलेला डल्ला,
ओढ पावसाची..
आरडून ओरडून पावसाची गाणी गाणं
पाण्यात बेफिकीरपणे खेळणं, नाचणं
ओढ पावसाची...
अनुभवलेले प्रत्येक क्षण मनात टिपले
मन माझे आहे अनुभवायला आसुसले
ओढ पावसाची.
