एक लढा धरणीसाठी
एक लढा धरणीसाठी
रेल्वे, मॉल, शाळा, मंदिरं
आज आहे बंद सारं.
काय नुसती जत्रेसारखी
माणसं सर्वत्र दिसायची
रस्त्यावर उभी राहून
तिथले पदार्थ खायची.
नको आता निष्काळजीपणा
आपल्या आवडींवर आळा आणा.
कारणाशिवाय पडू नका घराबाहेर
करोना वायरस आहे जालीम जहेर.
बाहेर जाता तोंडाला मास्क लावा.
हात पाय तोंड स्वच्छ साबणाने धुवा.
सॅनिटायझर लावून हात जीवाणूमुक्त ठेवा.
घर, सभोवतीचा परिसर नि स्वतःला स्वच्छ ठेवा.
आहार सकस घेऊन प्रतिकारशक्ती वाढवा.
पौष्टिक पदार्थ खाऊन स्वतःला तंदुरुस्त बनवा.
ताप, कोरडा खोकला असल्यास चेक अप करून घ्या.
दुर्लक्ष करू नका, देशासाठी स्वतःची काळजी घ्या.
या सर्वजण मिळून ह्या करोनाची साखळी तोडू या
आपल्यावर आलेल्या ह्या संकटाला पळवून लावू या.
