STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Others

3  

Sakharam Aachrekar

Others

तुला पाहताना

तुला पाहताना

1 min
11.7K

सकाळच्या सुंदर साखरझोपेवर

तुझ्या आठवणींची मंद झुळूक आली

त्या धुंद सुगंधानेच

मला जाग आली


तिला आठवतच उठलो

अंथरूणातून सावरत स्वतःला

आता निघायचय कॉलेजच्या बहाण्याने

तिलाच पुन्हा बघायला


सकाळच्या रिमझिम पावसात

स्वतःला सावरत तिला निघताना पाहिल

निघालो असलो जरी पुढे

मन मात्र माझ तिथेच राहीलं


आज बरच काही सांगून गेली

ती फक्त एका हसण्यातून

माहीत नाही काय किमया झाली

तिच्या एका बघण्यातून


आजच्या या अबोल भेटीचा

तो पाऊस साक्षी होता

त्या क्षणांना सुखावह करण्यासाठीच

कदाचित बरसत होता


तुला ही याची चाहूल लागली असेल

की मला काही सांगायचे आहे

मान्य नसले तुला तरीही

मनापासुन सांगतो तुझ्या वर खूप प्रेम आहे


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍