STORYMIRROR

सोनाली नाफडे

Romance

3  

सोनाली नाफडे

Romance

स्वप्न

स्वप्न

1 min
11.7K

विसरून सारे भान

जनरीत मोडली

मनाची आर्त हाक

पावले किनारी धावली   

स्वप्न उशाशी घेऊन

अथांग निळाई पांघरली


मोत्यांची, शिंपल्यातून

कानी कुजबूज आली

सुखाची साखर झोप

ओल्या वाळूत रुतली

अन मनात प्रेमाची

भरती-ओहोटी सुरु झाली


तो पौर्णिमेचा चंद्र

चांदण्यात निशा न्हाली

अलवार वाऱ्याची

झोंबे अंगास थंडाई

सागराची धरणीशी

प्रेमाची लढाई

मी अव्यक्त अबोल

दाखवत शिष्टाई


Rate this content
Log in

More marathi poem from सोनाली नाफडे

Similar marathi poem from Romance