STORYMIRROR

सोनाली नाफडे

Others

3  

सोनाली नाफडे

Others

कविता

कविता

1 min
113

कविता, कणकेच्या लाटी सारखी 

साकारत जाते मनाच्या पोळपाटावर 

शब्दांची पीठी लावत, 

भावनांची दुमड घालून 

साजिरं रूप घेते 

अनुभवी लाटण्याच्या

 हलकेच फिरण्याने... 

 कुठेच फाटू न देता, 

 चिकटू न देता 


तिला अलगद टाकायचं 

रसिकांच्या तप्त तव्यावर 

रसिक शेकून घेतील दोन्ही बाजूने 

आपण सोडून द्यायचं तिला 

धगधगत्या ज्वाळेत... 

टम्म फुगून येईल 

 फुलक्यासारखी 

 आपली कविता !         

 


Rate this content
Log in

More marathi poem from सोनाली नाफडे