सोड सख्या अबोला
सोड सख्या अबोला


सोड सख्या अबोला
असह्य आता होई मला
तुझा अबोला जीव घेई,
थोडी माघार मीही घेईन
थोडी तू ही साथ दे शब्दांना
सोड सख्या अबोला!!
भांडलास तरी चालेल
रुसल्यावर परक्या सम
भासे मला..
पुरे कर ही टाळाटाळ,
नजर रोखून बघ तरी मला,
सोड सख्या अबोला!!
आता ना आवडे पक्ष्यांची किलबिल,
निसर्गही वाटे सुना
तुझ्याच विचाराचे काहूर मात्र
माझ्या मना...
सोड सख्या अबोला!!
p>
घडल्या नकळतच चुका
आज सर्व विसरून, नव्याने जगुया पुन्हा,
सोड सख्या अबोला!!
चल चूक सर्व माझी,
असेच समजूया,
चल ना आज थोडेतरी बोलूया,
सोड सख्या अबोला
तू तर तुझ्या विश्वात सुखी
माझ्या एकटेपणाची जाणीव ना तुला,
सोड सख्या अबोला!!
चुकले चुकले वाटे सर्व
नजरेत माझ्या मीच गुन्हेगार
पण तुझ्या नात्याची कैद हवी मला...
सोड सख्या अबोला
सोड सख्या अबोला..!!!