STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Romance

3  

Tushar Chandrakant Mhatre

Romance

नाजुकसे फुलपाखरू

नाजुकसे फुलपाखरू

1 min
11.7K

नाजुकसे फुलपाखरू

पळावयास लागले,

साऱ्या फुलांचे मुखडे

वळावयास लागले!


सोडले त्याने तेव्हा 

उमलत्या कळ्यांचे रस्ते,

तिरपे कटाक्ष जेव्हा

कळावयास लागले!


पाकळ्या गुलाबी कसल्या,

पाहुनी नजारे कसले

फडफडत्या पंखांनी जेव्हा

रंग उधळावयास लागले!


आता मकरंदही संपला, 

नाही गोडवा कसला,

फुलणारे प्रेमबंध तेव्हा

ढळावयास लागले!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance