STORYMIRROR

Shubham Bhalekar

Romance Others

3  

Shubham Bhalekar

Romance Others

माझ्या मनातला निसर्ग

माझ्या मनातला निसर्ग

1 min
12K

आकाशाच्या धुंद पावसा मन माझे झुरावे।

सरणावर डोळे मिटताना ढग दाटूनी यावे।।


पावसाच्या रिमझिम सरींनी मग रडुनी मागे परतावे।

चिंब धरणीच्या मैफलीत या एकदाच रुंगुनी जावे।।


इच्छा मज आहे क्षणाची निसर्ग सादीत यावे।

सरणावर डोळे मिटताना ढग दाटूनी यावे।।


अवचित वाहावी बरसात फुलांची।

मैफिलींची आणि आठवणींची।।


पुन्हा एकदा जन्म घेऊनि परतावं वाटते।

इंद्रधनुच्या सप्तरंगात न्हाऊन जावे वाटते।।


पुन्हा एकदा पावसाच्या सोबती संगतीने नाचते।

आयुष्य हे असेच व्हावे पुन्हा तुझ्या प्रेमात पडावे।।


दिन वाहवा रातीचा सौंदर्य तुझे खुलत राहावे।

निसर्ग सादीत येऊनि अवचित मज चिंब करावे।।


धरणीच्या देहावरून मग रातराणी झुलत राहावे।

सरणावर डोळे मिटताना मग ढग दाटूनी यावे ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance