STORYMIRROR

विवेक द. जोशी

Romance

3  

विवेक द. जोशी

Romance

आठवण ही

आठवण ही

1 min
11.9K

आठवण ही तुझीच तुझीच येते

श्वास श्वास होऊनिया

सहवास हे फुल कळ्यांचे

प्रेमस्पर्श होऊनिया...।।


स्वप्न तू सोबतीचे

सावली तू अन् माऊलीही तू

आठवण तू आठवणींची ही तू

नजर का बावरे भास भास होऊनिया।।


दिसणे ते हसणे ते खळखळणे ते

मग्न डोही डुंबताना भिजणे ते

गर्द फांदीत पाखरे प्रणयी रमले ते

रती मदनाची साथ साथ होऊनिया।।


घालिते पायघड्या काळजाचा

मखमली तुझिया या पावलांना

राधा मी अमर जगी जाहली

कृष्ण ओठी बासुरी होऊनिया।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance