आत्ममग्न पाऊस
आत्ममग्न पाऊस


पाऊस सखा
मित्र अमित्र सन्मित्र
सोबती सहकारी
चराचर सहचर ।।
पाऊस सखी
मैत्रेयी दामिनी
स्वामिनी रागिणी
सहचर मनरमणी ।।
पाऊस सृजन
तन मन धन
आनंद घन गगन
नवनिर्माण श्रावण ।।
पाऊस प्रीत रीत
जीवनाचे गीत
रंग रंग उधळीत
आत फुला फुलात ।।
पाऊस उधाण
&
nbsp; आत्ममग्न साजण
तुडुंबलेले आंगण
भारलेलं हिरवं लेणं ।।
पाऊस जादूगार
मखमल हिरवीगार
शुभशकुनाची घागर
मन आनंद सागर ।।
पाऊस चिंब जोगवा
पाण्यात कागदी नावा
आठवणींचा सांगावा
मनमोहनाचा पावा ।।
पाऊस आषाढी
दिंडी पताकांची गुढी
इंद्रायणी आवडी
अबीर गुलाल सावडी ।।
पाऊस लहरी
त्राता कैवारी
पावली पंढरी
श्रीविठ्ठल विठ्ठल श्रीहरी ।।