मराठी भाषा
मराठी भाषा
1 min
165
मराठी असेही आमुची
माय बोली, मातृभाषा
सहज ,साधी शब्द एक
अन् अनेक अर्थांची आशा ।
देवनागरी सुंदर ही लिपी
मराठी बहुविध रूप हे देशी
संस्कृत जननी प्राकृत भगिनी
ही,अमृत अनुभवाची काशी।
मराठी भाषा नार नखरा
मर्दानी मानाचा मुजरा
रांगडा, अस्सल देशी जसा
गुलाब बोचरा अन् गजरा।
लवचिक अन् ओघवती
निर्झर ,नितळ खळखळ
विचार, सुविचार श्लेष
बाळ बोबडी अवखळ।
मराठी संत ध्यानस्थ मग्न
परभाषी शब्द सामावणारी
वेष, आवेश इंद्रधनुचा
मुखातूनी अभंग गाणारी ।
मराठी ओजस्वी ,राजस्वी
ही अखंड अमर काव्या
इंद्रायणी पावन श्रावण
आद्य संत सज्जन ओव्या ।।
