मराठी भाषा
मराठी भाषा
1 min
1
मराठी असेही आमुची
मायबोली, मातृभाषा
सहज ,साधी शब्द एक
अनेक अर्थांची आशा ।
देवनागरी सुंदर ही लिपी
मराठीचे बहुविध रूप हे देशी
संस्कृत जननी प्राकृत भगिनी
ही,अमृत अनुभवाची काशी।
मराठी भाषा नार नखरा
मर्दानी मानाचा गं मुजरा
रांगडा, अस्सल देशी जसा
गुलाब बोचरा नाजुक गजरा ।
लवचिक अन् ओघवती
निर्झर ,नितळ खळखळ
विचार, सुविचार श्लेष
बाळ बोबडी हीअवखळ।
मराठी संत ध्यानस्थ मग्न
परभाषी शब्द सामावणारी
वेष, आवेश रंग इंद्रधनुचा
मुखातूनी अभंग गाणारी ।
मराठी ओजस्वी ,राजस्वी
ही अखंड अमर काव्या
इंद्रायणी ही पावन श्रावण
आद्य शिव ,कांचन ओव्या ।।
