आपण म्हणा
आपण म्हणा
आपलं आयुष्य असतं
शिळे सारखं त्यातूनचं
घडवायचं असतं
आयुष्याचं सुंदर शिल्प ।
आयुष्यचं चिखलाचा गोळा
ज्याचा त्यालाच
पूर्ण करावा
लागतो विकल्प ।
आयुष्य संधी आहे जगणे ,गाण्याची
उन्हाच्या साऊलीत राहण्याची
अन्
स्वप्नांच्या पावसात
चिंब भिजण्याची ।
तसं सुंदर जगणं
फार सोपं असतं
"मी" नाही "आपण"म्हणा
अहो तसं,एकटं
कुणीचं नसतं ।।
म्हणाल तर, जीवन
नुस्तं माणसांचं वन
आपुलकी ,जिव्हाळाअन् मैत्री
म्हणजे पाऊस,इंद्रधनू अन् श्रावण...!