राहिलो न मी माझा
राहिलो न मी माझा


राहिलो न मी माझा
दरवळतो सुगंध
इथल्या फूलाफूलात
तुझ्याच देहाचा ।।
क्षणक्षण जिवघेणा
टाळीत जगतो आहे
मी मोहाचा.....।।
नव्हती जाण जिवास
उगाच शोधित राहिलो
अथांग मन डोहाचा ।।
संवेदनांच्या वनात तुझ्या
मन भूलले मोह क्षणाला
न राहिलो मी मजचा ।।
भूलणे फूलणे देणे घेणे
बहाणे जिवघेणे हे चांदणे
हा प्रश्न ना उत्तराचा...।।
राहिलो न मी माझा