STORYMIRROR

विवेक द. जोशी

Others

3  

विवेक द. जोशी

Others

झोप

झोप

1 min
136

झोप ,जागी होती

जागा शोधित ,झोपेसाठी ...

बंद डोळयांत ,झोप जागी 

अस्वस्थ ...!

मन जागे , झोप मागे

हा सूर्य जागतो ...

चंद्र होऊनि ...

मी दचकतो ...

मी , मला टक्क 

जागा पाहुनी ...

झोपेच्या विहार 

डोळे जागे,भोळे ...

डोळ्याचे अन् झोपेचे 

शोधित नाते अन् 

रात्र दिवसाचे गाणे गायी अन्

 रात्र, मात्र  

दिवसाचेच स्वप्न, 

रात्रीचे पाही ...!


Rate this content
Log in