STORYMIRROR

विवेक द. जोशी

Classics

3  

विवेक द. जोशी

Classics

माझं जगणं

माझं जगणं

1 min
115

माझं जगणं

नऊ रसांच्या, पलीकडले

आत्ममग्न ,

कुणाच्याही 

विरंगुळ्यासाठी तर मुळीच नाही .

मी आणि माझं एक "शुभ्र जग"...

आत्मशांतेत मग्न ,तल्लीन

हिमशिखरां सारखे मग्न ...!

उगवत्या आणि मावळत्या 

सूर्यासही नवल वाटावं असं ...

उत्तुंग,उन्नत ,शांत ,लोभस 

हिमशिखरे ...

सप्तस्वरांचा इंद्रधनू 

सप्तसुगंधाच्या मुलायम पाकळ्या ...

निशिगंध,केवडा,

रातराणीच्या फुलांचा धुंद

प्राजक्त सुगंध मंद

मन आनंद ,तन आनंद

लाभो सकळा आनंद ...

दु:खाच्या झाडाला 

सुखाच्या फुलांचा बहर

हे शुभ्र फुलांचे -मार्दवांचे गुच्छ ...!

झुलवितात स्वप्नांना 

फुलण्यासाठीच ,झुलण्यांसाठी -

नाही ,फुलण्यासाठीच !

अजून तरी 

स्वप्न करपात्र नाहीत .

 मार्दवांच्या गुच्छांच्या फांद्यांवर माझा स्थितप्रज्ञ फिनिक्स ...!

स्थितप्रज्ञानांचा दहावा रस ।।

मग्न ,ध्यानस्थ -नव्या दिशेच्या शोधत ,नव्या आकाशाच्या शोधात ...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics