स्पेशल वाटतेस तू…
स्पेशल वाटतेस तू…
मैत्रीण असूनही का ग एवढी स्पेशल वाटतेस तू…
खूप लांब असूनही नेहमी जवळ का गं भासतेस तू...
कडकडत्या उन्हात सावलीसारखी वाटतेस तू…
वाऱ्याची झुळूक यावी तशी अलगद येतेस तू…
मैत्रीण असूनही का गं एवढी स्पेशल वाटतेस तू…
माझ्या ध्यानी मनी नेहमी का गं असतेस तू…
नजरेतूनही तुझ्या खूप काही बोलून जातेस तू…
बोललो नाही मी तरी मन माझं वाचतेस तू...
एकटा असेल मी तेव्हा साथ नेहमी देतेस तू…
मैत्रीण असूनही का गं एवढी स्पेशल वाटतेस तू…
उदास असेल मी तेव्हा छान मला समजवतेस तू...
हसवण्यासाठी मला खूप काही करतेस तू…
चूक माझी झाल्यास खूप मला रागावतेस तू…
मी तुला रागावल्यास गोड मात्र हसतेस तू…
“रागावता नाही येत तुला” नेहमी मला म्हणतेस तू…
रागावू कसा गं मी तुला… आहेस किती निरागस तू…
मैत्रीण असूनही का गं एवढी स्पेशल वाटतेस तू…
माझी नसूनही फक्त माझीच का गं वाटतेस तू…
माझी नसूनही फक्त माझीच का गं वाटतेस तू…