STORYMIRROR

Rushikesh Misar

Romance

2  

Rushikesh Misar

Romance

मैत्री तुझी माझी

मैत्री तुझी माझी

1 min
516

मैत्री तुझी माझी एक कविता असावी,

शब्द तुझे असावे चाल माझी असावी…


दूर असूनही सुद्धा जवळ तू भासावी

शब्दांनी न सांगता भावना तुला कळावी….


तुझी आणि माझी मैत्री एक गाठ असावी,

कुठल्याही मतभेदाला वाट ही नसावी….


आनंदात मला बघून गोड तू हसावी, 

दुःखात तुला नेहमी साथ माझी असावी…


नको मला काही एकच आस असावी,

मी एकाकी असताना साथ तुझी असावी,..



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance