STORYMIRROR

Rushikesh Misar

Romance Others

3  

Rushikesh Misar

Romance Others

का ग खूप स्पेशल वाटतेस तू...

का ग खूप स्पेशल वाटतेस तू...

1 min
442

मैत्रीण असूनही का ग एवढी स्पेशल वाटतेस तू…

खूप लांब असूनही नेहमी जवळ का ग भासतेस तू...

कडकडत्या उन्हात सावली सारखी वाटतेस तू…

वाऱ्याची झुळूक यावी तशी अलगद येतेस तू…

मैत्रीण असूनही का ग एवढी स्पेशल वाटतेस तू…

माझ्या ध्यानी मनी नेहमी का ग असतेस तू..

नजरेतून ही तुझ्या खूप काही बोलून जातेस तू…

बोललो नाही मी तरी मन माझ वाचतेस तू...

एकटा असेल मी तेव्हा साथ नेहमी देतेस तू..

मैत्रीण असूनही का ग एवढी स्पेशल वाटतेस तू…

उदास असेल मी तेव्हा छान मला समजवतेस तू..

हसवण्यासाठी मला खूप काही करतेस तू…

चूक माझी झाल्यास खूप मला रागवतेस तू…

मी तुला रागवल्यास गोड मात्र हसतेस तू ….

मैत्रीण असूनही का ग एवढी स्पेशल वाटतेस तू…

“रागावता नाही येत तुला” नेहमी मला म्हणतेस तू…

रागावू कसा ग मी तुला…आहेस किती निरागस तू..

मैत्रीण असूनही का ग एवढी स्पेशल वाटतेस तू…

माझी नसूनही फक्त माझीच का ग वाटतेस तू…

माझी नसूनही फक्त माझीच का ग वाटतेस तू…

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance