STORYMIRROR

Rushikesh Misar

Romance

3  

Rushikesh Misar

Romance

का ग एवढी स्पेशल वाटतेस तू…

का ग एवढी स्पेशल वाटतेस तू…

1 min
310

मैत्रीण असूनही का गं एवढी स्पेशल वाटतेस तू…

खूप लांब असूनही नेहमी जवळ का गं भासतेस तू...

कडकडत्या उन्हात सावलीसारखी वाटतेस तू…

वाऱ्याची झुळूक यावी तशी अलगद येतेस तू…

मैत्रीण असूनही का गं एवढी स्पेशल वाटतेस तू…

माझ्या ध्यानीमनी नेहमी का गं असतेस तू...

नजरेतूनही तुझ्या खूप काही बोलून जातेस तू…

बोललो नाही मी तरी मन माझं वाचतेस तू...

एकटा असेन मी तेव्हा साथ नेहमी देतेस तू...

मैत्रीण असूनही का गं एवढी स्पेशल वाटतेस तू…

उदास असेल मी तेव्हा छान मला समजावतेस तू...

हसवण्यासाठी मला खूप काही करतेस तू…

चूक माझी झाल्यास खूप मला रागावतेस तू…

मी तुला रागावल्यास गोड मात्र हसतेस तू...

मैत्रीण असूनही का गं एवढी स्पेशल वाटतेस तू…

“रागावता नाही येत तुला” नेहमी मला म्हणतेस तू…

रागावू कसा गं मी तुला… आहेस किती निरागस तू...

मैत्रीण असूनही का गं एवढी स्पेशल वाटतेस तू…

माझी नसूनही फक्त माझीच का गं वाटतेस तू…

माझी नसूनही फक्त माझीच का गं वाटतेस तू…

साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance