मन
मन
1 min
344
कधी कधी मनाला सावरायचं असतं….
घडलेल्या क्षणांना मनात आणून रमायच असतं…
गोड आठवणीत गुंतायच असतं पण,
त्यातही मनाला सावरायचं असतं…!
असतो तो गार वारा क्षणात मोहित करणारा,
जसा मोगऱ्याचा सुगंध हर्षित करणारा….
वेड लागण्याआधी स्वतः ला बघायचं असतं…
कधी कधी मनाला सावरायचं असतं..
